Monday 9 January 2012

बायकांनो, स्वत:साठी वेळ काढा ..


लग्न झाल्यानंतर घर-ऑफिस-मुलं सांभाळता सांभाळता बायका स्वत:ला विसरूनच जातात. स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या या अपरिहार्य गोष्टींची व्यवस्थित विभागणी केली तर विवाहित स्त्रीला स्वत:साठी वेळ काढणं अवघड जाणार नाही. स्वत:साठी वेळ काढणे म्हणजे ब्युटी-पार्लर मध्ये जाणे नव्हे व नटून-थटून पार्ट्यांना अथवा लग्नादी समारंभांना जाणे नव्हे. स्वत:चा स्वत:शी संवाद घडून येणे हे इथे अभिप्रेत आहे. 
लग्न होऊन संसाराचा गाडा हाकता हाकता स्त्रीच्या वैयक्तिक आवडीनिवडी, तिचे छंद जबाबदारयांच्या डोंगराखाली गाडले जातात. तिने घरात जातीने लक्ष घालणे, अर्थार्जन करणे जितके गरजेचे, तितकेच स्वत:ला वेळ देणेही गरजेचे असते. अर्थार्जन नवरा-बायको दोघेही करत असताना घरकामाचा पत्कर एकट्या स्त्रीनेच घेण्याचा अट्टाहास कशाला? संसार दोघांचाही असतो,होणारी मुले दोघांचीही असतात. मग जबाबदारयांच्या बाबतीतील ही विषम विभागणी कशासाठी? बऱ्याच स्त्रिया स्वत:च्या दुखण्यांकडेही लक्ष देत नाहीत. काहीतरी क्षुल्लक,किरकोळ आजार असेल म्हणून दुर्लक्ष करत राहतात पण कालांतराने हाच आजार गंभीर रूप धारण करतो आणि मग सारे घरच आजारी असल्यासारखे वाटायला लागते. 
अनेक घरात वडीलधारयांनाही सुनेने अथवा मुलीने तिचा संसार उत्तम रीतीने करावा, तिच्या नवऱ्याला-मुलांना तिने सर्वतोपरी सुखी ठेवावे,त्यांना काही कमी पडू देऊ नये असे वाटत असते. पण आपल्या मुलीने अथवा सुनेने सर्वतोपरी आनंदी दिसावे यासाठी आपल्या मुलाला अथवा जावयाला उपदेश करताना ते कधीच आढळत नाहीत किंवा ते त्याबद्दल फारसे जागरूक नसतात. परिणामी संसार-ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना स्त्री शरीराने आणि मनाने थकून जाते आणि तिला  स्वत:साठी इच्छा असूनही वेळ काढता येत नाही. 
स्त्रिया कितीही शिकलेल्या असल्या तरी घरकाम-नवरा-मुले-वडीलधारे यांकडे त्यांना लक्ष पुरावावेच लागते. पण ह्या जबाबदाऱ्या सांभाळताना तिला स्वत:ला स्वत:पासून दूर ठेवावे लागते. कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी नवरोबांची परवानगी घ्यावी लागते. स्वयंपाकातील एखादा पदार्थ बिघडल्यास मोठ्यांची बोलणी खावी लागतात. मुलांना परीक्षेत कमी मार्क मिळाले तर तिचे मुलांकडे कसे लक्ष नाही याची चर्चा होते. घरातील ज्येष्ठांच्या सेवेत थोडी जरी कुचराई झाली तर तू कशी बेजबाबदार आहेस हे सांगायला नवरा कधीही मागेपुढे पाहत नाही. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असणे वेगळे आणि वैचारिक दृष्ट्या स्वतंत्र असणे वेगळे. जे आयुष्य एका स्त्रीचं अस्तित्व तिच्यापासूनच हिरावून घेतं ते किती सुखकारक असू शकेल?
हीच स्त्री कालांतराने मध्यम वयात येतेसंसाराची गाडी लौकिकार्थाने व्यवस्थित चालू असतेमुले मोठी झालेली असतात आणि त्यांच्या जगात आनंदाने वावरत असतातनवऱ्याची आर्थिक,सामाजिक पत चांगली असतेकामानिमित्त टुरिंग,पार्ट्या चालू असतातऑफिसमध्ये जाताना भरपेट डबा  ऑफिसमधून घरी आल्यानंतर वाफाळता चहा आणि रात्रीचे गरमागरम जेवण हक्काने मिळण्याची त्याची सोय अबाधित असतेस्त्रीला मात्र सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घर आणि ऑफिस याशिवाय दुसरे विश्वच नसतेतिला कुठलेही छंद जोपासायचे असतील तरी एकतर वेळनसतो नाहीतर तिच्या छन्दांकडे काहीसे विनोदाने किंवा उपहासाने बघितले जाते. हे करण्याची तुला काय गरज असे तिचे पतीराज तिला सहज म्हणून विचारतात आणि तिच्या आनंदावर विरजण पडते. 
आज अनेक स्त्रिया या वार्धक्यात विस्मृतीची शिकार होतात,एकटेपणा यांना खायला उठतोस्त्रिया आजारी पडल्यास त्यांची मनोभावे,तत्परतेने सेवा करणारे किती पुरुष असतात तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेचआज परदेशातील वृद्ध स्त्रिया एकेकट्या चारचार-पाचपाच तास ड्रायव्हिंग करतात,खेळांमध्ये भाग घेतात,शॉपिंग करतात,मित्र-मैत्रीणीना घेऊन करमणुकीचे कार्यक्रम बघतात,सहली करतात,पार्ट्यांना जातात,गार्डनिंग करतात,स्वत:च्या वाट्याला आलेला एकटेपणा आनंदाने उपभोगतातआपल्याकडील स्त्रिया मात्र पिकलेले केसदुखणारेगुडघेत्रस्त करणारे सांधेवाकलेली कंबर या देणग्या घेऊन कडेवर नातवंडे सांभाळताना दिसताततरुण वयातील राबणे वार्धक्यातही चालूच असतेआता डोळ्यांनी कमी दिसते या कारणास्तव वाचन होत नाही,विणकाम होत नाहीसांधे-गुढघे ठुसठूसतातम्हणून सहलीला जाणे,खेळ खेळणे हद्दपार झालेले असते. डायबीटीस,ब्लडप्रेशरची कवचकुंडले धारण केल्यामुळे खाण्यापिण्यावर उठण्याबसण्यावर बंधने आलेली असतात. आयुष्यातील उमेद खचून जाण्यासाठी बरीच करणे जमा झालेली असतात.
एकेकाळी आपण काढलेली चित्रे,त्यातील रंग आपल्याला खुणावीत असतातएकेकाळी आपण वाजवीत असलेली सतार आता घरातील माळ्यावर धूळ खात पडलेली असतेशाळेतील वक्तृत्व स्पर्धेत मिळालेले बक्षीस घरातील शोकेसच्या कोनाड्यात पडून असते,रोजचा पेपर हातात धरायला वेळ नसल्याने एकेकाळी आपण हिरीरीने सोडवलेली शब्दकोडी आता सोडवायची उत्सुकता पूर्णपणे लोपलेली असतेअनेकदा टूरला जाण्याचे रचलेले बेत प्रकृती अस्वास्थ्यास्तव आपल्याला रद्द करावे लागलेले असतात.एकेकाळी शिवणकामात,विणकामात निपुण असलेले आपले हात घरगुती कामांमध्ये व्यस्त असतातझाडांची निगा राखणे,त्यांना खतपाणी घालणे,फुले फुलताना बघणे त्यांच्याशी संवाद साधणे या गोष्टी संसाराचा गाडा ओढताना कोमेजून गेलेल्या असतातरेडिओवरील आवडते कार्यक्रम,गाणी,श्रुतिका,नाटुकली,परिसंवाद आता कानावर पडणे दुरापास्त झालेले असतेआयुष्याची अनेक वर्षे आपण फक्त इतरांसाठी जगलेलो असतोस्वत:साठी वेळ कसा काढावा हा प्रश्न सोडवता सोडवता आयुष्याची संध्याकाळ झालेली असते. आयुष्याचा जमाखर्च आपल्या मनावर एखाद्या ओरखड्यासारखी जखम करून जातोबहुतांश स्त्रियांची ही भळभळणारी जखम असतेएकेकाळी उखाणे,कविता तोंडपाठ असलेल्या स्त्रिया जाहीररीत्या दोन शब्द बोलायला चाचरतात. लहानपणी शिकलेले गाणे कालौघात मनातून हरवून गेलेले असते. एकेकाळी हस्तलिखित स्पर्धेत अव्वल आलेल्या स्त्रिया लेखणी हातात धरायची विसरलेल्या असतात,एकेकाळी आम्ही किती खेळ खेळत होतो हे सांगताना होणारा चेहरा बरेच काही सांगून जातो. अर्थार्जनाने संसाराला हातभार लावता आला, मुलांना सुस्थितीत वाढवता आले, दोन पैसे गाठीशी ठेवता आले, घर आधुनिकतेने सुसज्ज करता आले अशा युक्तिवादाने मनाचे कितीही सांत्वन करायचा प्रयत्न केला तरी आपण स्वत:ला स्वत :तून  उणे करून हे सगळे संपादन केले आहे ही जाणीव आपल्या मनाला नैराश्याच्या खाईत लोटण्यास पुरेशी असतेहे सगळे कधीतरी असह्य होते तेव्हा एखादी व्याधीग्रस्त स्त्री बिछान्यावर पडल्या पडल्या पुढचा जन्म स्त्रिचा देऊ नकोस असे त्या परमेश्वराला मनोमन विनवते तर एखादी स्त्री आपले या भूतलावरचे अस्तित्व पुसून टाकण्यास प्रवृत्त होते
प्रत्येकाचेच आयुष्य मौल्यवान असते. एकदाच मिळालेले सोन्यासारखे आयुष्य आपल्या मनासारखे आनंदाने व्यतीत करता येऊ नये यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती? याकडे स्त्रियांनी जर वेळीच गंभीरपणे पहिले तर त्यांना आयुष्य ही कैद न वाटता तो एक अलंकार वाटेल जो त्यांना अभिमानाने मिरवता येईल.


No comments:

Post a Comment