निमिषा कॉलेजमधून घरी आली आणि तिने पलंगावर स्वत:ला हताशपणे झोकून दिले. सुधाताईंनी कानोसा घेतला. हे असे किती दिवस चालायचे? हिच्याशी आजतरी बोललेच पाहिजे. निमू उठतेस का? मी गरमागरम चहा आणि तुझी आवडती भजी करते. निमिषाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुधाताईंनी ताडले की आज तिचे जरा जास्तच बिनसले असावे. गेले पंधरावीस दिवस निमिषा अस्वस्थ होती. तिचा चेहरा निराशेने काळवंडला होता. तिच्या म्हणण्याप्रमाणे खूप खूप क्रीम्स, लोशन्स, फेस स्क्रब्स लावूनही तिचा चेहरा टवटवीत, तजेलदार, तुकतुकीत दिसत नव्हता. जाहिरातीतील नट्यांनी अंगाला लावलेले साबण ती वापरत होती. त्यांनी रेकमेंड केलेली फेअरनेस क्रीम्स वापरत होती. शिवाय पिंपल्सचा प्रॉब्लेम सतावत होता तो वेगळाच! काही दिवसांत, काही महिन्यांत त्या नट्यांच्या चेहऱ्यात जे आमुलाग्र बदल होतात ते निमिषालाही अपेक्षित होते. त्यांच्या केसाचे टेक्स्चर आणि तिच्या केसांचे टेक्स्चर यांत तिच्या मते जमीन-अस्मानाचा फरक होता. सुधाताईंनी त्यांच्या परीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ज्याचे नाव ते! जाहिरातींची खोटी, बनावट दुनिया तिला खरी, वास्तवातील वाटायला लागली होती. ती स्वत:ची त्या जाहिरातींमधल्या मॉडेल्सशी, नट्यांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखू लागली होती. या न्यूनगंडाच्या भावनेमुळे तिला तिचे मित्र-मैत्रीणीही नकोसे वाटू लागले होते. थोडक्यात काय तिचे कशातच मन लागत नव्हते.
सुधाताई हुशार होत्या. आज कसेही करून निमिषाला सत्याचा चेहरा दाखवायचाच असे त्यांनी ठरवले. नाहीतर ती कायमची मोडून जाईल अशी चिंता त्यांना सतावत होती. त्यांनी निमिषाला बळेबळेच उठवले. तिला हात-पाय धुवायला सांगितले आणि तिच्या पुढ्यात गरम चहाचा कप ठेवला. निमिषा सुधाताईंना नजर (eye contact) सुद्धा देत नव्हती. सुधाताई आतमध्ये गेल्या आणि त्यांनी तिच्यासमोर एक मासिक उलगडून तिला दिसेल असे ठेवले. तिने हळूच मासिकावरील ते चित्र पहिले आणि ती उडालीच! श्शी! आई ही कोण आहे ग? तिने तो चेहरा ओळखला होता पण तिचा विश्वास बसत नव्हता. मग सुधाताईंनी असे अनेक चेहरे मासिक उलगडून तिला दाखवले. प्रत्येक चेहऱ्यागणिक तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटत होते. चेहऱ्यावर मेक-अप नसताना या सगळ्या नट्या कशा दिसतात पाहिल्यास ना? अग चेहऱ्यावर एवढी रंगरंगोटी केल्यावर आपणही त्यांच्यासारखे छानच दिसू की! त्यांची केशभूषा-वेशभूषा-मेकअप ही सारी बाह्य किमया असते. पण अभिनय मात्र त्यांचा त्यांनाच करावा लागतो बरं का. तू बघतेस त्या जाहिराती आकर्षक असतात पण तद्दन खोट्या असतात. या नट्या खरोखरच ते शाम्पू, ते साबण, ती नाना प्रकारची क्रीम्स वापरतात असं तुला खरंच वाटतं का? अग एकदा का अभिनय करून त्या पडद्यामागे गेल्या की अगदी तुझ्या-माझ्यासारख्याच त्या सामान्य दिसू लागतात. उलट इतक्या पॉवरफुल लाईट्समुळे त्यांची त्वचा लवकर खराब होते. ते खोलगट डोळे, ते बसकं नाक, ती गालफडे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या बघून निमिषा चांगलीच हबकली होती. याच नट्या पडद्यावर कित्ती सुंदर दिसतात? त्यांचं चालणं, बोलणं, हसणं, दिसणं पाहून अगदी मन मोहून जातं. खरेच त्यांच्या त्या रुपाला आपण इतके दिवस खरं समजत होतो आणि आपले आरशातले रूप पाहून मनोमन खंतावत होतो. जाहिरातीतल्या त्या मॉडेल्स काही दिवसातच कोणकोणती क्रीम्स थापून एकदम सुंदर दिसायला लागायच्या, त्यांचे ते शाम्पू लावल्यानंतरचे सळसळते ,चमकदार केस पाहून आपण दिपून जायचो. आईने किती वेळा आपल्याला सांगितले तरी आपण विश्वास म्हणून ठेवायचो नाही. निमिषा खुदकन हसली. तिचा हसरा चेहरा पाहून सुधाताई आनंदल्या.
आई मी या मासिकातल्या नट्यांपेक्षा खरंच चांगली दिसतेय की! निमिषाचा हरवलेला विश्वास तिला परत मिळाला होता. अग आई कॉलेजचा अन्युअल डे दोन दिवसांवर आलाय आणि कॉमपेरिंग मला करायचं आहे. मी विदुलाला फोन करते हं ! असे म्हणून एका वेगळ्याच खुशीत निमिषाने मोबाईल कानाला लावला.

No comments:
Post a Comment