आम्ही शाळकरी पोरं असताना आम्हाला हटकून निबंधाचा विषय असायचा, माझा आवडता छंद. मग प्रत्येकाचे वेगवेगळे छंद यानिमित्ताने निबंधाच्या वहीत लिहिले जायचे. वाचन, गाणं, नृत्य ,पर्यटन,चित्रकला, रंगीबेरंगी शंख-शिंपले जमविणे, फुलझाडे लावणे, वेगवेगळ्या देशांचे stamp जमविणे, नकाशे गोळा करणे, मोरपिसे जमविणे, क्रिकेट अथवा बुद्धिबळ खेळणे, नट-नट्यांचे फोटो गोळा करणे, रंगीत गोट्या जमविणे, सुवासिक रब्बर तयार करणे अशा आणि यासारख्या अनेक गोष्टींचे छंद निबंधवहीत उमटायचे. मग हाच छंद चांगला कसा ? यामुळे आपला वेळ कसा सत्कारणी लागतो ? वगैरे गोष्टींचे स्पष्टीकरण देऊन निबंध संपवायचा. पुढे लौकिकार्थाने मोठे झाल्यावर हे लिखित छंद निबंधवहीतच बंदिस्त राहायचे. ती मिटलेली पाने काही परत उघडायचीच नाहीत.
आजकाल या छंदांची व्याख्या बरीच बदलली आहे. घरोघरी वेगळेच छंद जोपासले जाऊ शकतात. जी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा आपल्या आवडीखातर करतो त्याला छंद असे म्हणतात. कालामानपरत्वे छंदांच्या कसोट्या ,त्याची परिमाणे बदलली आहेत. फर्निचर परत परत पुसणे हाही छंद होऊ शकतो. घरातून बाहेर जाताना कुलुपात किल्ली बराच वेळ घोळवणे, अनोळखी माणसांकडे बघून उगीचच हसणे आणि ओळखीच्यांना ओळख न देणे हाही छंद असू शकतो. प्रात:काळी दारावर येणाऱ्या दुधवाल्याशी तेच तेच रटाळ वाद उकरून काढणे, कार पार्किंगवरून गुराख्याशी हुज्जत घालणे, इस्त्री,कचरा,पेपर,घरकाम या महत्वपूर्ण कामे करणाऱ्यांशी ते आपले गतजन्मीचे वैरी असल्यागत भांडणे हेही छंद माणसाला असू शकतात. रस्त्यावर येताजाता पचापच थुंकणे हा तर एक भारताचा राष्ट्रीय छंद आहे. वाहतुकीची सोय म्हणून रेल्वे खात्याने आंदण दिलेल्या लोकलमध्ये भाज्या चिरून त्याचा कचरा नि:संकोचपणे टाकणे, घाणेरड्या चित्रांनी आणि मजकुरांनी लोकलच्या भिंती सुशोभित करणे हाही छंद वर्षानुवर्षे निष्ठेने जोपासला जातो.
आमच्या ओळखीच्यांपैकी एका गृहस्थांना खुर्च्या सरकवण्याचा छंद आहे. म्हणजे खुर्च्या या टेबलाभोवतीच फेर धरून असाव्यात याविषयी कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही परंतु यातील एखादी खुर्ची जरी काही कारणपरत्वे कोणीही इतस्तत: हलवली की गेलाच यांचा पारा वर! तिची जागा बदलायचा हक्क कोणालाही नाही. काही जण सारखे ओटा पुसत असतात. ओट्यावर पाण्याचा एक थेंबही यांना विचलित करू शकतो. अंथरुणावर पडलेली एखादी सुरकुती घरातील कलहाचे कारण ठरू शकते. त्यामुळे हे महाभाग पुन्हा पुन्हा चादर घालण्याचा खटाटोप करत राहतात. काहींना औषधांच्या गोळ्या खाण्याचा छंद असतो. काहीजण कानात इयरफोन्स घुसवून चित्रविचित्र चेहरे करून हातवाऱ्यांच्या सहाय्याने गुणगुणत सकाळी व्यायाम सद्दृश असं काहीतरी करताना दिसतात.

काहींना दुसऱ्यावर करवादण्याचा छंद असतो. काहींना कुचाळक्या करण्याचा छंद असतो. काहींना सकाळी तीनतीन तास देवाची पूजा करून घरातील इतर कामे चुकवण्याचा छंद असतो. काही ज्येष्ठ व्यक्तींना इतर तरुणांना न्याहाळण्याचा छंद असतो. त्यांच्या डोळ्यांचं आणि एक्सरे मशीनच काम एकच असतं. इतरांच्या आरपार बघणे. देशाच्या सीमेवर गस्त घालायचा विचार यांनी जरूर करावा. नुसत्या बघण्याने शत्रूला चीतपट करतील. काहींना हातात टी.व्हीचा रिमोट घेऊन सारख्या वाहिन्या बदलण्याचा छंद असतो. काहींना पसारा करण्याचा छंद असतो . काहींना रस्त्यावरचे खड्डे मोजण्याचा छंद असतो . काहींना सारखे भाज्यांचे भाव विचारण्याचा छंद असतो. काहींना दुकानांची नावे वाचण्याचा छंद असतो. काहींना बागेतील सुंदर हिरवळीवर कागदाचे कपटे करून टाकण्याचा छंद असतो. काहींना रिक्षाची नंबर प्लेट लिहून ठेवण्याचा छंद असतो. काहींना निगुतीने केलेल्या स्वयंपाकाला नाके मुरडीत जेवायचा छंद असतो. काहींना चिल्लर खुळखुळविण्याचा छंद असतो. काहींना अंग कराकरा खाजवायचा छंद असतो.
यांतील किती छंद विधायक आणि किती छंद विघातक हे ज्याचे त्याने ठरवायचे! काही काळानंतर या अशा निरर्थक छंदांची सवय जडते आणि मग त्याचे रुपांतर व्यसनात होते. शालेय निबंधवहीत लिहिलेले निबंध आपल्याला हसत असतात. आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आपल्याला खुणावत असतात. आपल्या भीषण छंदांच्या आहारी जाऊन आपल्या कपाळावर वेडा असं शिक्का मारून घ्यायचा की निबंधवहीतील छंदांची मनमोहक फुलपाखरे अंगाखांद्यावर खेळवायची आणि त्यांच्या रंगांची सुखद उधळण आजूबाजूच्या आपल्या लोकांवर करायची या निवडीचे स्वातंत्य्र ज्याचे त्याचे!
No comments:
Post a Comment