आपल्याकडे लग्न ही वधू-वरांसाठी योजलेली एक सर्वसंमत रीत आहे याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करून त्यांचे सो-कॉल्ड पालक वेड्यावाकड्या प्रोफाईल्सचे रतीब घालत असतात. या प्रोफाईल्समध्ये लिहिलेला तपशील आणि प्रत्यक्ष विवाह यामध्ये विचारांचे महदंतर असते. मुलांचे पालक तर आपला मुलगा लग्नाला उभा आहे म्हणजे आता 'ओन्ली स्काय इज द लिमिट' अशा अविर्भावात प्रोफाईल्स प्रसवत असतात. माझ्या मुलीसाठी मी आणि प्रामुख्याने ती गेली सहा-सात वर्षे काही 'Matrimony sites' शी सतत संपर्कात आहोत. मुलाला मुलगी कशी हवी आहे याविषयीची माहिती तसेच मुलाची स्वत:ची माहिती या दोन गोष्टी महत्वाच्या! पत्रिका बघणे न बघणे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न! त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळणे अत्यावश्यक आहे. त्यांनी एकमेकांना त्यांच्या गुण-दोषांसकट स्वीकारणे महत्वाचे आहे. त्यांचे शिक्षण जसे महत्वाचे तशी त्यांच्यातील एक माणूस म्हणून जपलेली गुणवत्ताही तितकीच महत्वाची आहे. कारण संसार हा शैक्षणिक कुवतीशी करावयाचा नसून मनातून उपजणाऱ्या प्रेमभावनेशी त्याची गाठ बांधावयाची असते.
मुलाचे शिक्षण जास्त असेल कर त्याच्यावर जास्त प्रेम, मुलाचा पगार उत्तम आहे कर त्याच्यावर भरपूर प्रेम मग तो माजोरडा असेल, माणूसघाणा असेल, व्यसनी असेल तरी क्काही फरक पडत नाही हे विधान कितपत सयुक्तिक आहे? एखादी मुलगी मुलाला लग्नाच्या दृष्टीने बघते म्हणजे तो दिसायला कसा आहे? त्याची ओव्हरऑल personality कशी आहे? त्याचे विचार कसे आहेत? थोडक्यात तो एक माणूस म्हणून कितपत चांगला आहे? 'दाखव पगाराची स्लीप मगच लग्न करीन किंवा दाखव तुझी इस्टेट मगच लग्न करीन' असे म्हणणाऱ्या उपवर मुली अभावानेच आढळतात.
हे असे असले तरीही लग्नाच्या बाजारात उतरलेला आपला उच्चशिक्षित आणि रग्गड पैसा कमावणारा मुलगा म्हणजे अनेक आई-वडिलांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच वाटते. ठीक आहे वधू-वरांच्या पत्रिका तपासा, गुण-मेलन होते की नाही ते बघा, दोघांचे भावी आयुष्य चांगल्या रीतीने निभावणार असेल असे वाटल्यासच पुढे जा पण इतर बाबी ज्या त्या दोघांच्या प्रापंचिक आयुष्यात तसूभरही मोलाच्या नाहीत त्यांचे अवडंबर कशाला माजवायचे? आणि अनेक आई-वडील नेमके हेच करतात.
आपल्या मुलासाठी मुलगी चांगली हवी याविषयी कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही पण तिने अल्पावधीत सगळ्यांशी adjust केले पाहिजे, ती कितीही शिकलेली असली, नोकरी करणारी असली तरी ती गृहकृत्यदक्ष असलीच पाहिजे ही जबरदस्ती का? म्हणजे तुमच्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून ती ऑफिसात जाणार, तसाच चांगला पगारही घेणार पण घरी आल्यावर मात्र तिने स्वत:ला गृहकृत्यांना जुंपून घ्यायचे आणि त्याने एसीत ऐसपैस पसरायचे हा कोणता न्याय? ती तुमच्या घरात आली म्हणजे तुमच्या हरकत घेण्याजोग्या सवयींनाही तिने समजून घ्यायचे आणि तिच्या हातून घडलेल्या एखाद्या नगण्य चुकीलाही तुम्ही गुन्ह्याचे स्वरूप द्यायचे ही कुठली रीत?
आम्ही ब्राह्मणकुलोत्पन्न आहोत, आमचे गोत्र अमके आहे, आमच्या घराण्याचा इतिहास असा आहे, आमचे कुलदैवत हे आहे , आम्ही खानदानी, उच्चभ्रू आहोत, आमच्याकडे गाड्या, नोकर-चाकर आहेत, एवढ्या ठिकाणी आमच्या इस्टेटी आहेत या भांडवलावर कोणतेही संसार सुखी होत नाहीत. मुलीची उंची, तिचा वर्ण, तिचे रूप, तिची जात, तिचे घराणे, तिचे शिक्षण आणि नोकरीतील मासिक पगार ह्या गोष्टी जुळल्यानंतर त्या दोघांचा संसार सुखी होईल याची ग्वाही कुणीही देऊ शकत नाही. त्यात मुलगा परदेशवाऱ्या करणारा किंवा तिथेच कायम वास्तव्यास असणारा असेल तर ह्या मात्या-पित्यांचा भाव आणखीच वधारतो.
मुलगी चश्मेवाली नको. का बुवा? मुलगा चष्मेवाला असला तरी तो त्याचा रुबाब समजायचा. हे वर्गीकरण का? मुलीच्या डोळ्यांची ब्बुबुळे अमक्याच रंगाची हवीत, ती निखालस गोरी हवी, तिची फिगर उत्तम हवी, तिचे केस अशाच प्रकारचे हवेत, तिचे दात सरळ हवेत, तिचे ओठ वाजवीपेक्षा जास्त जाडे नकोत, ती सदासदैव हसतमुख हवी. अरे मुलगी म्हणजे काय दुकानातील शो-केस मधील एखादी वस्तू आहे का? की जिचे मूल्य फक्त तिच्या बाह्यस्वरूपावरच अवलंबून आहे? म्हणजे तुमचा मुलगा जाड भिंगाचा चष्मा वापरणारा ढापण्या असला तरी चालेल, त्याचा वर्ण सुरणाचा किंवा वांग्याचा असला तरी काही प्रॉब्लेम नाही, तुमच्या मुलाचा चेहरा आणि मान ह्यांच्यात distinguishing points नसले तरी चालतील, तुमच्या मुलाच्या दातांवर तंबाखूमुळे पिवळे डाग पडले असतील तरी चालतील. कोणत्या बेसिसवर? तो मुलगा आहे म्हणून? कुलदीपक आहे म्हणून? घराण्याचा एकुलता एक वारस म्हणून?
ह्या सो-कॉल्ड उच्चभ्रू घराण्यातील मुलांच्या भविष्याची दोरी त्यांच्या आई-वडिलांच्या हातात असते. मुलगी नकटी वाटते नाकारा, सावळी दिसते नाकारा, बुटकी आहे नाकारा, तिचे घराणे आपल्यासारखे नाही नाकारा, तिचा पगार खास नाही नाकारा, तिचे गोत्र माहित नाही नाकारा, तिचे कुलदैवत शंकास्पद आहे नाकारा, ती जाडी वाटते नाकारा, तिच्याकडे चांगला मोबाईल नाही नाकारा अशी नकारघंटा हे माय-बाप सातत्याने वाजवत राहतात. आपल्या पोटी निपजलेला मुलगा हा जणू मदनाचा पुतळा आहे अशा भ्रमात हे माता-पिता असतात. सगळे उत्तम गुण त्याच्या ठायी मौजूद आहेत अशी आपली त्यांनी त्यांची समजूत करून घेतलेली असते.
एरवी पत्रिका, कुंडली या शब्दांच्या वाऱ्यालाही न उभी राहणारी ही मुले लग्नाला उभी राहताच आई-वडिलांच्या मतासमोर आपली मान तुकवतात. आपले खाण्या-पिण्याचे सर्व चोजले येणाऱ्या मुलीने खुशीने संभाळावेत, मुलांच्या संगोपनाची पूर्ण जबाबदारी तिने घ्यावी, आपल्या आई-वडिलांची, भावंडांची मर्जी तिने राखावी, त्यांची सेवा करावी,त्यांचा आदर करावा, तिने महिन्याचा पगार आपल्या हातात द्यावा, माझ्या मित्रमंडळींना तिने सुग्रास खाऊ-पिऊ घालावे, घरी येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्थित सरबराई तिने करावी, सणवार-व्रते नेमाने पाळावीत अशा 'माफक' अपेक्षा ह्या नवरदेवांच्या असतात. थोडक्यात काय घरी-दारी तिने स्वत:ला पिसून घ्यावे आणि इतरांसाठी आपला देह चंदनासारखा झिजवावा अशा उच्च विचारांनी ही मुलाकडची मंडळी भारलेली असतात.
सुखी संसाराची समीकरणे २ अधिक २ चार या पद्धतीने सोडवता येत नाहीत. उत्तम राहते घर अधिक उत्तम पगार इज इक्वल टू सुखी, आनंदी संसार असे इक्वेशन मांडता येत नाही. संसार सुखाने, एकमेकांशी न भांडता कसा करावा हे शिकवणारी विद्यालये नसतात. लग्नातील होमात स्वत:विषयी बाळगलेला फाजील अहंकारही समर्पित करायचा असतो ही जाणीव ज्याची त्याला व्हावी लागते. बाह्य गोष्टींनी स्वत:ला आणि दुनियेला फक्त चार दिवस दिपवता येते पण संसाराचे चक्र सुयोग्य दिशेने फिरते ठेवायला काही चांगल्या आंतरिक उर्मींची गरज असते.
तेव्हा अनेक अनावश्यक गोष्टींचा भरणा केलेली प्रोफाईल अपलोड करून त्यायोगे आपण मनाजोगती मुलगी सहज मिळवू शकू या भ्रमात वावरणाऱ्या समस्त मात्या-पित्यांना मी एवढेच सांगू इच्छिते की अशी माहिती द्या किंवा करून घ्या जी तुमच्या मुलाच्या आणि येणाऱ्या सुनेच्या संसारात उपयुक्त ठरू शकेल. जात-पात, प्रतिष्ठा-पत, शिक्षण, नोकरी,पगार, गाडी-बंगला, नोकर-चाकर, आर्थिक गुंतवणुका, इस्टेटी या बाह्य गोष्टी एका ठराविक मर्यादेपर्यंतच महत्वाच्या आहेत.

संसाराचे शेत हिरवेगार दिसण्यासाठी आधी उत्तम विचारांचे बी पेरले गेले पाहिजे, त्याला तेवढ्याच उत्तम आचारांचे खत घातले पाहिजे तरच त्याला सौख्याच्या मोत्यांचे पिक येईल नाहीतर नुसती महागडी बाह्य फवारणी कुचकामी ठरेल.
No comments:
Post a Comment