२७ एप्रिल १९१२ साली जन्मलेली ही सदाबहार तरुणी म्हणजे झोहरा सेहगल. वाढत्या वयाच्या दुपटीने वाढणाऱ्या उदासीनतेच्या छटांचा मागमूस तिच्या चेहऱ्यावर औषधालाही दिसत नाही. 'संध्याछाया भिवविती हृदया- लागले नेत्र रे पैलतीरी' असा आयुष्याबद्दलचा तिचा अप्रोच नाही. डोळ्यात खट्याळ हसू आणि चेहऱ्यावर मिश्कील भाव हे तिच्या शतकी आयुष्याचे भांडवल आहे. इतरांच्या टोप्या उडवण्यात ती तरबेज आहे. तिचा जीवन जगण्याचा उत्साह एखाद्या षोडषेलाही लाजवेल असा आहे. 'चीनी कम' मध्ये 'जिम जाओ जिम जाओ' म्हणून तिच्या ६४ वर्षीय मुलाच्या मागे तगादा लावणारी आणि 'सेक्स इन द सिटी' बघणारी झोहरा वास्तवात काही वेगळी नाही. आयुष्यातील चढ-उतारांच्या घसरगुंडीवर अमाप मजेने, आनंदाने, उत्साहाने हिंदोळणारी ही तरुणी म्हणजे जीवन कसे जगावे ह्याचा वस्तुपाठ आहे.
सहारणपूर , उत्तर प्रदेश हे झोहरा मुमताजचे जन्मगाव. तिच्या सात भावंडांत ती तिसरी. दिवसाकाठी पाच वेळा नमाज पडणाऱ्या सुन्नी मुसलमान परंपरेची ती पाईक! बालवयातच तिच्या अवखळ आणि खट्याळ स्वभावाची चुणूक तिच्या आप्तांना अनुभवायला मिळाली. तिला झाडांवर चढण्याचा विलक्षण छंद! तिला मुलांचे खेळ खेळायला आवडत. तिने 'tomboy' असा लौकिक संपादन केला होता. अवघ्या वर्षाची असताना तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली आणि ती दृष्टी परत आणण्यासाठी तब्बल ३ लाख एवढी प्रचंड किंमत मोजावी लागली. तरुण वयात आईच्या मायेला ती आणि तिची भावंडे पारखी झाली. आईच्या इच्छेनुसार 'क्वीन मेरी गर्ल्स कॉलेज', लाहोर इथे तिची शिक्षणासाठी रवानगी झाली. तेव्हा पडद्याची ( बुरख्याची) प्रथा ही कडक होती. कॉलेजचा सगळा स्टाफ इंग्लिश होता. तिच्या बहिणीचा फसलेला विवाह तिने पहिला आणि लग्नबंधनाच्या आहारी न जाता पुढे शिकण्याचा निर्णय तिने घेतला. ती पदवीधर झाली आणि तिच्या मामाने तिची रवानगी युरोपला केली. तिथे तिच्या मावशीने 'मेरी विंगमन' या नृत्यशाळेत तिला दाखल करण्याचा निर्णय घेतला. पडद्याच्या प्रथेमुळे तिला नृत्यशिक्षण घेता आले नव्हते. पुढील तीन वर्षे ड्रेसडन, जर्मनी येथे तिने आधुनिक नृत्याचे रीतसर शिक्षण घेतले. याच सुमारास प्रख्यात नर्तक उदय शंकर यांचा 'शिव-पार्वती' वर आधारित नृत्याविष्कार तिच्या पाहण्यात आला. ती मनोमन हरखून गेली. उदय शंकर यांना भेटली आणि भारतात परतल्यानंतर माझ्या नृत्यसंस्थेत तुला नोकरी देईन असे आश्वासन तिला त्यांनी दिले. पुढे तिने उदय शंकर यांच्या ग्रुपबरोबर नृत्यानिमित्ताने अनेक दौरे केले.
१९४० साली उदय शंकर यांच्या अल्मोरा येथील नृत्यसंस्थेत ती शिक्षिका म्हणून रुजू झाली. तिथे तिला कमलेश्वर सेहगल हा इंदोरचा तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असलेला संशोधक, नृत्यनिपुण असा तरुण भेटला आणि तिने स्वत: मुस्लीम असूनही एका हिंदू तरुणाशी जन्मांतरीची लग्नगाठ जोडण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तिच्या घरच्यांनी सुरवातीस या लग्नास हरकत घेतली पण नंतर त्यांनी त्यांचा विरोध मागे घेतला. झोहाराने किरण आणि पवन अशा दोन मुलांना जन्म दिला. दरम्यानच्या काळात झोहरा आणि कमलेश्वर हे दोघेही नृत्यदिग्दर्शक झाले होते. त्यानंतर दोघे लाहोरला परत आले आणि त्यांनी 'झोहरेश डान्स इंस्टीट्युट' ची स्थापना केली. त्यानंतर तिची बहिण उझरा बट्ट हिच्याप्रमाणेच झोहराने 'पृथ्वी थिएटर' मध्ये प्रवेश केला आणि नंतरची चौदा वर्षे नृत्याच्या निमित्ताने अवघा भारत पिंजून काढला. तिने 'इप्टा' साठी काम केले आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.
बाजी, आवारा सारख्या चित्रपटांसाठी तिने नृत्य दिग्दर्शन केले. तुरुंगातील कैद्यांसाठीही तिने शोज आयोजित केले. १९५९ साली कमलेश्वरांना देवाज्ञा झाली आणि झोहरा दिल्लीत आली. तेथील नव्याने स्थापन झालेल्या 'नाट्य संस्थेची ती संचालिका झाली. तिला नृत्यासाठी स्कॉलरशिप मिळून ती लंडनला गेली. तिथे तिची ओळख भरतनाट्य करणाऱ्या राम गोपाल यांच्याशी झाली. Chelsea इथे तिने काही काळ नृत्य शिकवले. याच दरम्यान बीबीसी TV साठी तिने काही एपिसोड्सचे संचालनही केले. १९९० च्या आसपास ती भारतात आली आणि तिने काही फिल्म्स, TV शोज व प्लेज केले. पाकिस्तान दौरा केला. काही स्टेज परफॉरमन्सेस दिले.
झोहरा अनेक पारितोषकांनी सन्मानित झाली. १९६३ सालचे 'संगीत नाटक अकॅडमी अवार्ड' तिला मिळाले. १९९८ साली 'पद्मश्री' या किताबाने ती गौरवली गेली. २००१ साली 'कालिदास' सन्मानाची ती मानकरी ठरली. २००२ साली 'पद्म भूषण' हा मान तिला लाभला. २००४ साली 'संगीत नाटक अकॅडमी फेलोशिप' तिला मिळाली. २०१० साली 'पद्म विभूषण' हा किताब तिने पटकावला.
अशी ही अभूतपूर्व झोहरा आणि तिचा हा सांस्कृतिक प्रवास! आज वयाच्या शंभराव्या वर्षीही तिला पाच फुट सहा इंच उंची, सुंदर फिगर आणि लांबलचक केस हवे आहेत. ज्या वयात नामस्मरण आणि पोथ्या हाच आयुष्याचा आधार असतो त्याहीपेक्षा जास्त वयात जोहरा सर्वस्वी वेगळी आणि उमेदीची स्वप्ने उरी बाळगते आहे. ईश्वर तिच्या सगळ्या इच्छा या पृथ्वीवरील एक स्पेशल केस म्हणून पुऱ्या करो हीच इच्छा आणि प्रार्थना!

Congratulations on your 100th post!!!!
ReplyDeletewishing you many many more such milestones :-)))