आजकाल संगीत ही काही मूठभर लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही हे जरी कितीही खरे असले तरी एखादे गाणे नक्की कशा प्रकारे गावे याचे मार्गदर्शन जाणकार गुरूच करू शकतो. आजकाल जो तो आपापले गाण्याचे कौशल्य आजमावत असतो. यात वाईट काहीच नाही परंतु आपले गाणे आपल्याच कानाला सर्वप्रथम गोड लागायला हवे, अपील व्हायला हवे. आपल्या गाण्यातील त्रुटी आपल्याच कानाला प्रथम खटकायला हव्यात. हौसेखातर बरेच संगीतप्रेमी करावके सिस्टीम घेतात पण इथे एक गोष्ट मला नम्रपणे नमूद करावीशी वाटते की आपल्या गाण्याचा अंदाज मात्र यावरून बांधणे जरा धाडसाचेच आहे.
करावके सिस्टीममध्ये प्रामुख्याने हिंदी तसेच मराठी आणि इतर प्रादेशिक गाणी समाविष्ट केलेली असतात. प्रत्येक गाण्याला एक विशिष्ट कोड नंबर असतो. हा कोड नंबर तुम्ही फीड करताच टी.व्हिच्या स्क्रीनवर त्या गाण्याचे शब्द येतात. पार्श्वसंगीत सुरु होते आणि ते संपताच तुम्हाला माईकवर गाणे सुरु करायचे असते. एकेका ओळीतील एकेक शब्द जसजसा 'हायलाईट' होतो त्याबरहुकुम तुम्हाला गाणे गायचे असते. कडव्यांमध्येही पार्श्वसंगीत असते. ह्यातील बहुतांश गाणी अनेकदा ऐकलेली असल्यामुळे माहितीची असतात. तुम्ही जसेच्या तसे गाण्याचा प्रयत्न करता. ह्यातील तांत्रिक बाबीत तुम्ही तुमचे गाणे बसवलेत की तुमचा स्कोर साधारण शंभर पैकी पंचाण्णव ते शंभर असा येऊ शकतो. तुम्ही मनोमन हरखून जाता. आपण गाणे उत्तम गाऊ शकतो असा समज निर्माण होतो जो बऱ्याच वेळेस बरोबर नसतो.
या सिस्टीममधील गाण्याचे 'tracks' हे ओरीजनल गाण्यावरूनच तयार केले असल्याने गाण्याची पट्टी फार उंच असते. ती बऱ्याचदा आपल्या गळ्याला पेलवणारी नसते. तरीही आपण त्याच पट्टीत गायचा प्रयत्न करतो. पण अशा उंच आणि गळ्याला न मानवणाऱ्या पट्टीतून गायल्याने गळा खराब होऊ शकतो. काही मंडळी जी केवळ हौसेखातर अशा पद्धतीने गाणी गाऊ पाहतात त्यांनीही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्ही गाणे सुरात गायलात की बेसूर गायलात याचे गुणविश्लेषण ( evaluation) ही सिस्टीम देऊ शकत नाही. तुमचा शंभर पैकी शंभर हा स्कोर हा फक्त तांत्रिक मुद्द्याला धरून असतो. अशा पद्धतीने गाणारयाचा 'टेक्निकल आस्पेक्ट' एकवेळ पक्का होऊ शकतो परंतु त्याची सुराची कच्ची बाजू या सिस्टीमवर गाऊन सुधारू शकत नाही.
प्रत्येक माणसाचा आवाज निसर्गत: वेगळा असतो. काहीजण उंच पट्टीतून सहज गाऊ शकतात तर काहींचा आवाज अजिबात चढत नाही. आपण आपल्या गळ्याला पेलवणाऱ्या पट्टीतून गायलो तरच आपले गाणे चांगले होऊ शकते अन्यथा ती एक फक्त कसरत होते. ज्याची सुराची बाजू पक्की आहे आणि जो उंच पट्टीतून गाऊ शकतो अशांसाठी ही सिस्टीम लाभदायक आहे. पण मी सुद्धा इतर गायकांप्रमाणे 'परफॉर्म' करू शकतो अशा 'attitude' ने जे गाऊन दाखवतात त्यांचे गाणे केविलवाणे वाटते.
गाण्यातील शब्दफेक, आवाजातील चढउतार, भावना या गोष्टींचे गुणावलोकन ह्या सिस्टीममध्ये नसते. त्यामुळे तुम्हीच तुमचे 'critic' झाला नाहीत तर तुम्ही गायलेले गाणे आणि त्या गाण्याचा स्क्रीनवर दिसणारा उत्तम स्कोर यातील तफावत तुम्हाला दिसू शकणार नाही. सूर, ताल, शब्दफेक, भावना आणि सादरीकरण यांच्या सुयोग्य समन्वयातून उत्तम गाणे जन्माला येत असते. यांतील कोणतीही एक बाजू कमी पडली तरी गाणे लंगडे होते, खुजे होते. न पेलवणाऱ्या पट्टीतून खोटा आवाज काढून गायल्यास आवाजात सशक्तपणा येत नाही, बरेच वेळा आवाज चिरकतो, फुटतो. कणसूर गायल्यास ऐकणारा जाणकार असेल तर त्याला ते अपील होत नाही.
एखादं गाणं आपल्या गळ्याला पेलवणाऱ्या पट्टीत असेल तर ते सादर करण्याचा जरूर प्रयत्न करावा. पण त्याआधी ते गाणं खूप वेळा अभ्यासपूर्वक ऐकावं. आपल्या गाण्याकडे डोळसपणे, प्रामाणिकपणे बघण्याचा प्रयत्न करावा. गाण्यातील त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कानांना उत्तम सुरांची सवय लावावी. गाणे गायल्यानंतरही त्याचे मूल्यमापन करायला आपण कचरू नये. संगीतातील 'गुरु' ह्या पर्यायाचा आपण जरूर विचार करावा आणि त्याच्या आधाराने आपला संगीतविषयक दृष्टीकोन आपण प्रगल्भ करावा.

No comments:
Post a Comment