ब्रुनो : काय रे पीटर, काल काय मिळालं?
पीटर : बिर्याणी आणि कटलेट्स.
ब्रुनो : भाग्यवान आहेस लेका. ती अकरा नंबरवाली भलतीच फिदा दिसतेय तुझ्यावर.
पीटर : अरे नवऱ्याचा तुसडा आणि कळकट चेहरा आणि ते त्याचं शाहरुख खानसारखं तोतरं बोलणं
ऐकून ती सॉलिड कंटाळली आहे. परवाच फोनवर कुठल्यातरी मैत्रिणीला सांगत होती.
ह्याच्यापेक्षा माझा पीटर बरा असंही पुढे म्हणाली.
ब्रुनो : ग्रेट गोइंग. पमी आली नाही अजून. मॉर्निंग वॉक संपला नाही वाटतं तिचा!
पीटर : का एवढा अस्वस्थ होतोस? तुला शंका आहे की ती ब्राउनी बरोबर गेली आहे. Am I right?
ब्रुनो : म्हणून नाही. ती माझ्यासाठी पिझ्झा आणणार होती.
पीटर : यार हल्ली तू त्या स्कोडाखाली का झोपत नाहीस? किती ऐसपैस जागा असते तिथे.
ब्रुनो : अरे यार तो स्कोडाचा मालक उपद्रवी आहे. माझी शेपटी दिसली रे दिसली की मला लाथ
मारायला बघतो जणू काय मी त्याची सासरयाकडून ढापलेली स्कोडा पळवून नेणार आहे.
मारायला बघतो जणू काय मी त्याची सासरयाकडून ढापलेली स्कोडा पळवून नेणार आहे.
पमी : हाय फ्रेंड्स. मी आले.
ब्रुनो : तुझा भप्पी लाहिरीच्या साईजचा देह मला दिसणार नाही असं तुला का वाटतं ?
पमी : ब्रुनो, माझ्या स्थूलपणाची चेष्टा केलेली मला चालणार नाही. Henceforth I shall not tolerate.
ब्रुनो : ब्राउनीने शिकवलं वाटतं बोलायला?
पीटर : तुमची वादावादी पुरे झाली आता. ही बघा सिंड्रेला पण आली.
सिंड्रेला : हाय एव्हरीबडी.
पीटर : हे तुझ्या हातात काय आहे?
सिंड्रेला : अरे रस्त्यावरची चार-पाच मोठी पत्रकं आणली आहेत. जाहिरातदार पत्रके वाटतात. लोक एकतर त्यांना केराची टोपली तरी दाखवतात किंवा बाहेर फेकून देतात. मी विचार केला की ही आपण फूड प्लेट म्हणून वापरावी.
ब्रुनो : आयडिया चांगली आहे पण फूड कुठे आहे?
पमी : अरे प्लेट आली आहे ना आता फूड पण येईल. Just waw.
ब्रुनो : म्हणजे ?
पमी : अरे म्हणजे wait and watch. हल्ली सगळं काही थोडक्यात बोललं किंवा सांगितलं जात नाही का?
पीटर : ए, ती बघा सतरा नंबरवाली येते आहे. एव्हरीबडी टेक पोझिशन.
सिंड्रेला : काल पार्टी झालेली दिसतेय घरी. केक, वेफर्स म्हणजे नक्कीच कुणाचा तरी वाढदिवस असणार.
ब्रुनो : आधी जिभा साफ करा. मग अंदाज बांधा. जाम भूक लागली आहे.
पमी : ए केक, वेफर्स आणि पिझ्झा मस्त होता. आपली तर पार्टीच झाली.
पीटर : काल मागच्या गल्लीत सॉलिड राडा झाला. बाहेरची कुत्री येऊन attitude देत होती.
ब्रुनो : मग लुई, विल्सन आणि विकीने इंगा दाखवला की नाही?
पीटर : दाखवला रे. पण अशी नेहमीच बाहेरची कुत्री यायला लागली तर आपल्यासारख्या स्थानिक
कुत्र्यांनी कुठे जायचं?
ब्रुनो : डरु नको यार. मी डेव्हिड भाईशी बोलतो.
सिंड्रेला : उद्या पाच नंबर गल्लीत 'मिस लेन' ही स्पर्धा आहे. मी पार्टीसिपेट करते आहे. तू येणार आहेस का पमी?
ब्रुनो : ही काय 'सुदृढ श्वान' स्पर्धा आहे का पमीने भाग घ्यायला?
पमी : आता जर तू मला एकदाही कुत्सित बोललास तर तुझं त्या अमिना बरोबरचं लफडं सगळ्यांना सांगीन.
सिंड्रेला : ए मला सांग ना?
पमी : सांगू?
ब्रुनो : सॉरी. पण प्लीज कोणाला काही सांगू नकोस माझे बाई.
पीटर : ही अमिनाची काय भानगड आहे रे? तुझ्या गळ्यावर, छातीवर त्या मार लागल्याच्या खुणा आहेत त्या नक्की कसल्या?
ब्रुनो : तुला नसत्या उचापती काय करायच्या आहेत?
सिंड्रेला : त्या अमिनाच्या मागे केवढी कुत्री लागतात ! पण मला काही ती तेवढी सेक्सी वाटत नाही हं!
पीटर : हम पाच मधल्या विद्या बालनला पाहून तिच्यात कोणाला 'सिल्क मटेरीअल' आहे असं वाटलं होतं का?
ब्रुनो : तुम्ही कशाला नसते वाद घालताय? आम्ही येऊ हं स्पर्धा बघायला. काय रे पीटर?
पीटर : नक्की.
सिंड्रेला : पण लक्ष भलतीकडे ठेवू नका म्हणजे झालं. नाहीतर परत मार खायला लागेल.
ब्रुनो : टोमणे मारणं बंद कर आणि उद्याच्या तयारीला लाग.
डेव्हिड : हलो एव्हरीबडी. काय चाललंय?
पीटर : काही नाही भाई. तुम्ही इथे कसे काय?
ब्रुनो : ( पीटरच्या कानात) अरे मूर्खा, निवडणुका जवळ आल्या आहेत.
पीटर : ओह , सॉरी भाई. आमच्यासाठी काय काम आहे ?
डेव्हिड : प्रचार करायचा आहे. घोषणा तयार करायच्या आहेत. जाहीरनामा लिहायचा आहे. पत्रके वाटायची आहेत.
ब्रुनो : भाई, पत्रके कशाला? ती एकतर केराच्या टोपलीत तरी जातात किंवा ( सिंड्रेलाकडे बघत) फूड प्लेट म्हणून वापरली जातात.
पीटर : हो भाई. उगाच खर्च कशाला? आम्ही भुंकून भुंकून सगळीकडे चांगला प्रचार करू. एकही एरिया सोडणार नाही.
ब्रुनो : भाई, ती गोरेगावची टोळी प्रचारासाठी बोलवायची का?
डेव्हिड : नको. त्यांच्या डिमांड्स फार आहेत. त्यापेक्षा आपण विरार-भाईंदरवाल्यांना बोलवूया. शिवाय ते टगेगिरी करण्यातही हुशार आहेत. त्यामुळे टोनीच्या टोळीला वचक बसेल.
पीटर : ठीक आहे. पण सगळ्यांच्या पोटा-पाण्याचं काय?
पमी : अरे, जेनिफर कधी उपयोगी पडणार मग? तिलाच देऊ आपण सगळ्यांच्या खाण्याचं contract.
डेव्हिड : ठीक आहे. पण तुमचे लक्ष असू द्या. कोणी नाखूष राहायला नको. काय? नाहीतर ऐन वेळेला माझी पंचाईत करतील.
सिंड्रेला : मग ठरलं तर सगळं एकदाचं. चला आता कामाला लागूया.
डेव्हिड : चला मी निघतो. मला जागावाटपाचा घोळ अजून निस्तरायचा आहे.
ब्रुनो, पीटर, पमी व सिंड्रेला : आम्ही पण येतो.
No comments:
Post a Comment