सविताबाई कासावीस होऊन खोलीतल्या खोलीत येरझारा घालत होत्या. एकदम काहीतरी सुचून त्या व्हरांड्यात आल्या आणि घराबाहेरील कानोसा घेऊ लागल्या. त्यांची नजर अस्वस्थपणे चोहीकडे भिरभिरत होती. शेजारच्या पोतनीस आजींकडे गावाहून राहायला आलेला त्यांचा नातू, बंडू याने सविताबाईंची रडवेली नजर पाहत विचारले, काकू काय झालं ? 'आमचे वामनराव पळाले हो' सविताबाई हंबरडा फोडण्याच्या बेतात होत्या. झालं. बंडू धावत धावत आजीकडे गेला आणि म्हणाला, अगं आजी, शेजारच्या काकूंचे हे पळाले म्हणून त्या रडत आहेत. अग्गोबाई! आजींनी ओठांचा मोठ्ठा चंबू केला. पोतनीस आजींचे डोळे बटाट्याएवढे विस्फारले. चहाचे आधण तसेच अर्धवट बंद करून ही बातमी सांगायला त्या जवळ जवळ पळाल्याच!
थोड्याच वेळात ललिताताई, मंजुळावहिनी , गोडसे काकू, डिसोझा आण्टी, जयाताई, सुषमाताई, हजरनीस काका, वाकनीस काका, रेळे काका, पेंटर, अरोरा, मल्होत्रा, बिनीवाले अशा वीस एक माणसांचा गट माणुसकीला जागत एकत्र आला. त्यांचा मूक मोर्चा सविताबाईंच्या घरापाशी येऊन थडकला. आपल्या व्हरांड्यापाशी आलेला जनसमुदाय बघून सविताबाईंना दु:खाचा मोठा उमाळा आला. समस्त बंधू-भगिनींना अशा प्रसंगी नेमके कसे वागावे याचा पूर्वानुभव नसल्यामुळे ते नुसतेच दु:खाचे भाव चेहऱ्यावर आणू लागले.
तेवढ्यात रेळे आणि वाकनीस काकांच्या नेतृत्वाखाली काही मंडळी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाली. 'तपस्या' सोसायटीतील एवढी ज्येष्ठ आणि सभ्य मंडळी एकाएकी पोलीस स्टेशनच्या दिशेने येत असल्याचे पाहून इन्स्पेक्टर कदम एकदम अटेन्शन मध्ये उभे राहिले. कांबळे आणि जाधव हवालदार त्यांच्यामागे गांभीर्याने उभे राहिले. मंडळींचे पडके चेहरे एका दृष्टीक्षेपात कदमांनी ताडले. त्यांनी हलक्या आवाजात विचारले, काय घडले आहे? रेळेकाका पुढे सरसावले. अहो इन्स्पेक्टर, सविताबाईंचे यजमान घरातून पळाले. बाकीची मंडळी गोंधळल्याचे , घाबरल्याचे, चक्रावल्याचे भाव चेहऱ्यावर बाळगून उभी राहिली.
मंडळींशी चर्चेत वेळ न घालवता इन्स्पेक्टर कदमांनी रीतसर कम्प्लेंट नोंदवून घेतली आणि कदम आणि कांबळे यांनी इतर रहिवाशांसकट 'तपस्या' कडे कूच केले. या वेळेपर्यंत सोसायटीतील उरल्यासुरल्या रहिवाशांनाही सविताबाईंच्या घरातील अशुभाची चाहूल लागली होती. त्यामुळे जो तो सचिंत होऊन त्यांच्या घराभोवती ताटकळत उभा होता. इन्स्पेक्टर आणि हवालदार आल्यामुळे तेथील वातावरण एकदम तंग झाल्यासारखे वाटू लागले. प्रत्येकजण दुसऱ्याकडे पाहू लागला. कदमांनी सोसायटीतील मंडळींना बाहेरच थांबण्याचा इशारा केला आणि ते सविताबाईंच्या घरात प्रवेश करते झाले.
काल रात्री ते घरीच होते का? या कदमांच्या पहिल्या प्रश्नावर सविताबाईंनी फक्त मान हलवली आणि त्या हमसाहमशी रडू लागल्या. इन्स्पेक्टर कदमांची पोझिशन एकदम विचित्र झाली. त्यांनी हवालदार कांबळे यांना इशारा केला. बाई, मिळतील ते. रडू नका. कांबळे जरा सहानुभूतीने म्हणाले. बरं, मला सांगा या घराला एवढं एकाच दार आहे का बाहेर जायला? कदमांनी विचारले. हो. पण यांना दरवाज्याची गरजच काय मुळी? मी सांगते, ते भल्या पहाटे नक्कीच या समोरच्या खिडकीतून पळाले असणार. एव्हाना सविताबाईंचे डोळे रडून रडून सुजले होते. इन्स्पेक्टर कदमांनी आणि हवालदार कांबळे यांनी त्या खिडकीकडे पाहत एक आश्चर्योद्गार काढला. या खिडकीतून पळाले? कदमांनी पुन्हा एकदा अविश्वासाच्या सुरात विचारले. मला तरी तसंच वाटतंय बाई. त्यांचा वर्ण गोरा आणि डोळे घरे आहेत का? बरोबर. सविताबाई उत्तरल्या. उंची किती या कदमांच्या प्रश्नावर सविताबाईंनी त्यांचा हात खूपच खाली नेला. कदम आणि कांबळे एव्हाना हवालदिल झाले होते. बरं , घरातून जाताना त्यांनी कोणते कपडे घातले होते? अहो, त्यांना कपडे घालायची सवय कुठे होती या सविताबाईंच्या उत्तरानंतर बाईंच्या डोळ्यात वेडाची झाक दिसते आहे का ते दोघे पाहू लागले.
एवढ्यात सविताबाईंचे सुजून लाल झालेले डोळे आनंदातिशयाने लकाकले. त्या एकदम ओरडल्या, ते आले. ते आले. कदम आणि कांबळे एकदम त्या दिशेला बघू लागले पण त्यांन काहीच दिसू न शकल्याने सविताबाईंकडे ते संशयाने पाहू लागले. अहो बाई, कुठे आहेत तुमचे ते? कदमांनी काकुळतीला येऊन विचारले. अहो ते बघा तिथे, त्या छपरावर! आता मात्र धक्क्याने आपली वाचा बंद होते की काय असे दोघांना वाटू लागले. ते आ वासून छापराकडे पाहू लागले. तिथे एक गुबगुबीत, गलेलठ्ठ , पांढराशुभ्र बोका आपल्या मिशा चाटीत निवांतपणे बसला होता.
ते बघा आमचे वामनराव. माझ्या लग्नात माझ्या सासूने मला ही अनमोल भेट दिली होती. हा बोका माझ्या सासरचा आहे म्हणून याचे नाव मी वामनराव ठेवले. आणि तुमचे यजमान? इन्स्पेक्टर कदमांनी न राहवून अखेरचा प्रश्न विचारला. ते गेलेत त्यांच्या मित्रांबरोबर सहलीला. दोन दिवसांसाठी. इन्स्पेक्टर कदम आणि हवालदार कांबळे दोघांनी एकदमच कपाळावर हात मारून घेतला आणि सभोवतालच्या गर्दीची यत्किंचितही दाखल न घेता त्यांनी तडक पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेतली.

No comments:
Post a Comment