कुठल्याही परिचितांच्या दरवाज्यावरची बेल वाजवल्यानंतर दार उघडतानाच, आकारमान वाढलंय तुझं, केस किती पांढरे झालेत अशी किंवा यापैकी कोणतीही स्वागतपूर्ण वाक्ये ज्या घराच्या उंबरठ्यात बोलली जात नाहीत आणि दार उघडल्यानंतर ज्या ओठांची चंद्रकोर होताना प्रयास पडत नाहीत अशांपैकी एक म्हणजे टोळेकाकूंचं घर!
तशी अंजलीताईंची आणि माझी ओळख एका तपाची. त्यांचे सासरे कै. भाऊसाहेब टोळे यांच्याकडे मी काही वर्षांपूर्वी ज्योतिषविषयक मार्गदर्शनासाठी जायचे. तेव्हा अंजलीताईंची प्रथम ओळख झाली. बहुतेक वेळा त्या लगबगीतच असायच्या. पुढे कधीतरी त्यांनी पेटी शिकण्याची इच्छा माझ्यापाशी बोलून दाखवली आणि अशा तऱ्हेने त्या माझ्या संगीत परिवारात सामील झाल्या. नंतर काही वर्षे त्या माझ्याकडे गाणेही शिकत होत्या. अतिशय अदबीने बोलायच्या. मी वयाने त्यांच्यापेक्षा लहान पण त्यांची सांगीतिक मार्गदर्शक म्हणून माझ्याविषयीचा आदर त्यांच्या बोलण्या-वागण्यातून सतत व्यक्त व्हायचा. आज त्या माझ्याकडे शिकत नसल्या तरी त्यांची ती स्नेहाची, आदराची भावना कायम आहे.
मला माहित आहे की त्यांना कौतुकाची, प्रशंसेची allergy आहे. जरा त्यांच्याबद्दल स्तुतीपर दोन शब्द बोलावे की त्या कमालीच्या संकोचतात. सेवाभावी वृत्तीचं अंजलीताई हे मूर्तिमंत प्रतीक आहेत. चेहऱ्यावर कोणतेही त्रासिक भाव न आणता त्यांच्या सासू-सासऱ्यांची मनोभावे सेवा करताना मी त्यांना पाहिलं आहे. इतरांना मदत करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. अत्यंत अगत्यशील. स्वभाव रोखठोक. काहीसा कडक वाटणारा. हल्लीच्या तरुण-तरुणींच्या उथळ वागण्याची त्यांना मनस्वी चीड आहे. विवाहित मुला-मुलींनीही एका विशिष्ट चौकटीत राहूनच आचरण करावे असे त्यांना वाटते. अंजलीताई चांगले वाचतात. चांगले विचार ग्रहण करून ते विचार आचरणात आणू पाहतात. त्या परमोच्च शक्तीला मानणाऱ्या जरूर आहेत पण म्हणून त्या कर्मकांडाच्या आहारी जाणाऱ्या नाहीत.
त्यांच्या घराला 'घरपण' आहे. साधेपणा हा त्यांच्या घराचा 'आत्मा' आहे. त्यांच्या घरात कुठेही बिनदिक्कतपणे वावरावेसे वाटते. टोळे काकांचाही हसरा, प्रेमळ चेहरा स्वागत करण्यासाठी असतोच! आग्रह करकरून पोटभर सुग्रास अन्न खायला घालणे हा अंजलीताईंचा स्थायीभावच आहे. मला जेवायचे निमंत्रण दिल्यानंतर, येताना काहीही घेऊन यायचं नाही निशाताई असा प्रेमळ दमही त्या देतात. त्याकडे मी लक्ष देत नाही हा भाग वेगळा. अंजलीताईंच्या हाताला उत्कृष्ट चव आहे. 'मेतकूट पोहे' ही त्यांची खास डिश आणि मी आणि माझ्या लेकींची खास फर्माइश. त्यांच्या घरी गेल्यावर मला माहेरी आल्यासारखेच वाटते. जेवण असो, दिवाळीचा फराळ असो वा अल्पोपहार असो, अंजलीताईंचा सढळ हात मी नेहमीच अनुभवत आले आहे.
अशी निरपेक्षपणे प्रेम करणारी माणसे आज समाजातून हळूहळू लुप्त होत चालली आहेत. उंची फर्निचर, महागडे शो पीस व इलेक्ट्रोनिक gadgets आणि बद्धकोष्ठ झाल्यासारखी हसणारी माणसे अशा प्रकारची घरं मला त्यांची पायरी चढण्यासाठी आकृष्ट करू शकत नाहीत. मेणचट चेहरे, टोमणेवजा बोलणी आणि दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल नको तेवढे औत्सुक्य या गोष्टी मला अशा व्यक्तींच्या दरवाज्यावरची बेल वाजवण्यापासून परावृत्त करतात.
या सगळ्या पार्श्वभूमीवर टोळेकाकूंचं घर हे माझ्यासाठी आनंदनिधान आहे. आमच्या इतक्या वर्षांच्या ऋणानुबंधाचे हेच सबळ कारण आहे.

Very true. I am her husbands cousin sister .I agree with what you have written.Some people have the gift of putting into words the exact sentiments of many others.Y ou have that gift and thanks for writing this blog.
ReplyDeleteVery true. I am her husbands cousin sister .I agree with what you have written.Some people have the gift of putting into words the exact sentiments of many others.Y ou have that gift and thanks for writing this blog.
ReplyDeleteDear Madhavi,
ReplyDeleteMany Thanks :)